नोंदणी क्र. महा-६२०/०८, एफ-१३९३४ (औ.)
मुख्य कार्यालय : 'दिव्य-रिदम', ६, अजिंठा पार्क,
नंदनवन कॉलनी, औरंगाबाद - ४३१००२ (महाराष्ट्र).
जन्म : दि. १५ ऑगस्ट १९२२
जन्मस्थळ : देशवंडी, ता. सिन्नर, जि. नाशिक
(महा.राज्य)
आई : सईबाई कर्डक
वडील : तबाजी कर्डक
भावंड : सदाशीव (थोरला भाऊ)
सावित्राबाई (धाकटी बहीण)
पत्नी : शांताबाई कर्डक
मुलगी : मीरा (जगु शकली नाही)
दत्तक पुत्र : रविंद्र कर्डक
घरची परिस्थिती आणि वडिलांचा व्यवसाय :
कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची. मोळया विकणे, टेंभुर्णिच्या पानाचे विडे करुन विकणे आणि हेडीचा व्यवसाय.
दादांचे लहानपण :
गुरं चारणे, जत्रेत कुस्त्या खेळणे, शिवडी येथे गिरणी कामगार, मातीकाम, सिमेंट कॉंक्रिटचे काम, चिक्की विकणे, आईसफ्रुट विकणे, खडी फोडणे, टाटा ऑईल मील मध्ये नोकरी, इत्यादी कामे करत लहानपण गेले.
छंद :
हिन्दी चित्रपट पाहणे, कथाकार, नट होण्याची अभिलाषा, वाचन, 'लल्लाट लेख' या नाटकात घुमा-याची भुमिका केली.
लेखण :
३ मे १९४३ रोजी पहिले विडंबन गीत लिहीले, तेव्हापासून २००४ पर्यंत गीत लेखन व गायनाचा अखंड प्रवास. प्रकाशित आणि अप्रकाशित मिळून साधारणतः दहा हजाराच्या आसपास गीत रचना. उर्दुतील गजल, खमसा, नज्म हे प्रकार मराठीत आणले.